18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरउदगीर-जळकोट तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मिटवणार

उदगीर-जळकोट तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न कायमचा मिटवणार

उदगीर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण उदगीर, जळकोट तालुक्यात असून तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे गावापासून शेकडो किलोमीटर दूर महानगरांमध्ये त्यांचे स्थलांतर होत आहे. उदगीर, जळकोट तालुक्यात बेरोजगारीची समस्या अत्यंत गंभीर आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत उदगीरच्या आमदाराने मंत्रीपद असूनही उदगीर विधानसभा मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असे आरोप महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार सुधाकर संग्राम भालेराव यांनी केले.
महायुती सरकारच्या महाराष्ट्र काळात बेरोजगारीच्या संकटाचा सामना करत आहे. ३० वर्षाखालील ३१ लाख तरुण वर्ग हा बेरोजगार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेच्या नावाखाली १० लाख बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली आहे. पात्र लाभार्थीही १० हजार रुपयांच्या मासिक भत्यापासून अद्याप वंचितच आहेत.  यामध्ये उदगीर जळकोट तालुक्यातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उदगीर विधानसभेच्या आमदाराला राज्याचे कॅबिनेट मंत्रीपद असतानाही इथला विकासाचा अनुशेष भरून काढण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत.  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होईल. यावेळी उदगीर व जळकोट येथे एमआयडीसी उभी करून तरुणांच्या हाताला काम देण्याची भूमिका आपली असणार आहे.
शिवाय सुशिक्षित तरुणांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारणार असून उदगीर विधानसभेच्या सर्वांगीण विकासाचा खुंटलेला आ- लेख पुन्हा गतिमान करण्याचे काम आगामी काळात करणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर भालेराव यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी डॉ. अंजुम कादरी, जळकोट विधानसभा अध्यक्ष धोंडीराम पाटील, उदगीर विधानसभा अध्यक्ष अजित पाटील, जळकोट तालुकाध्यक्ष नेमीचंद पाटील, राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन केंद्रे, उदगीर शहराध्यक्ष अजीम दायमी, श्रीमती मठपती, सखाराम सुर्यवंशी, राजकुमार हुंडेकर, व्यंकट सूर्यवंशी, हारुण पटेल, संजय पाटील, जाकीर पटेल, सुनील भाले, तौफिक पटेल, प्रल्हाद सुर्यवंशी, गुणवंत मडे, आजम पटेल, मुसा पटेल, जळबा डुमणे, व्यंकट हुंडेकर, गजानन चंदनशिवे, महंमद मुंडकर,  रसूल मुंडकर यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR