16.1 C
Latur
Wednesday, December 3, 2025
Homeलातूरउदगीर नगर परिषदेसाठी ६८.१२ टक्के मतदान

उदगीर नगर परिषदेसाठी ६८.१२ टक्के मतदान

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर नगर परिषदेसाठी ६८.१२ टक्के मतदान झाले. एकूण ५६६६३ मतदान झाले    पुरुष  ६९.१ टक्के (२९४२३ ) महिला ६७.१९ टक्के  (२७२३२) महिलां तर ५२.९४ टक्के तर  इतर ९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  एकूण ९१ केंद्रावर ४४० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सुव्यवस्थेसाठी १००  पोलीस कर्मचा-यासह अशा वर्कर व अंगणवाडी कार्यकर्ता यांचाही सहभाग होता. तसेच प्रत्येक बुथवर एक नगरपरिषद कर्मचारी व्हील चेअरसह परिषदेकडून नियुक्त करण्यात आला होता.   स्त्री  मतदान केंद्र दिव्यांग मतदान केंद्र व तरुण मतदान केंद्र, अशी  आदर्श मतदान केंद्र  लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये तयार करण्यात आले होते. न्यायालयीन प्रकरणामुळे नगरपरिषद नगरसेवक वार्ड क्रमांक आठ १५ व १६ ब या ठिकाणी न्यायालयाने निवडणूक रद्द केली असूनही येथे २१ तारखेस निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
निवडणूक प्रकिया शांततेत पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर मुख्याधिकारी व प्रशासक सोमनाथ जाधव यांच्यासह  उपविभागीय पोलीस आधिकारी  भावलंवडे, पोलीस निरिक्षक दिलीप गाडे, राजकुमार पुजारी यांनी परिश्रम  घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR