26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्या‘उद्भव’ प्रकल्पातून लष्कराच्या वारसाचा शोध!

‘उद्भव’ प्रकल्पातून लष्कराच्या वारसाचा शोध!

नैतिक मुल्ये । लष्करप्रमुख मनोज पांडे यांचे प्रतिपादन; वेद, पुराणे, उपनिषदांचा अभ्यास

 

नवी दिल्ली : प्रतिनिधी
संरक्षण क्षेत्रात देशाचा दृष्टिकोन समृद्ध बनविण्याचा उद्देश असलेल्या ‘उद्भव’ या प्रकल्पातून लष्कराने महाभारतातील लढाया, प्रसिद्ध वीरांचे पराक्रम आणि राज्यकलेतील भारताच्या समृद्ध वारसाचा शोध घेतला आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले. ‘भारतीय सामारिक संस्कृतीतील सामारिक पद्धती’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, गेल्या वर्षी सुरू केलेल्या ‘उद्भव’ प्रकल्पात वेद, पुराणे, उपनिषद आणि अर्थशास्त्रासारख्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला. या ग्रंथांत परस्परसंबंध, नीतिमत्ता आणि नैतिक मूल्ये रुजलेली आहेत. यातून प्रसिद्ध भारतीय आणि पाश्चात्त्य विद्वानांमध्ये लक्षणीय बौद्धिक अभिसरण दिसून आले.

‘उद्भव’चा उद्देश संरक्षण दलांना भविष्यासाठी सज्ज बनविण्यावर लक्ष्य केंद्रित करून प्राचीन सामारिक कौशल्याला समकालीन लष्करी क्षेत्रामध्ये एकीकृत करण्यासह लष्करात स्वदेशी बाबींना प्रोत्साहन देण्याचा आहे. भारताच्या समृद्ध लष्करी वारशाला आकार देणा-या मौर्य, गुप्त आणि मराठा साम्राज्यातील सामारिक प्रतिभेचा आणि महाभारतासारख्या काव्यातील लढायांचा शोध ‘उद्भव’ प्रकल्पातून घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘उद्भव’ प्रकल्पाने प्रख्यात भारतीय आणि पाश्चात्त्य विद्वानांमधील महत्त्वपूर्ण बौद्धिक अभिसरण उघड केले आहे, त्यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि दृष्टिकोन यांच्यातील प्रतिध्वनी अधोरेखित केला. भारताच्या आदिवासी परंपरा, मराठा नौदलाचा वारसा आणि लष्करातील वीरांचे विशेषत: वीरांगनाचे पराक्रम उलगडून नवीन क्षेत्रांतील शोधाला चालना दिली आहे, असेही पांडे यांनी नमूद केले.

हा प्रकल्प शैक्षणिक, विद्वान, अभ्यासक आणि लष्करी तज्ञ यांच्यात नागरी-लष्करी सहकार्य वाढवून संपूर्ण देशाचा दृष्टिकोन मजबूत करत आहे. अशा प्रकारचे सामुदायिक प्रयत्न प्राचीन भारताचे संरक्षण दल व सुशासनाच्या अभ्यासाची व्याप्ती वाढते तसेच देशाचा सामारिक दृष्टिकोन समृद्ध होतो, असेही जनरल पांडे म्हणाले.

भारताच्या दार्शनिक व सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेला सामारिक शब्दसंग्रह आणि वैचारिक चौकट विणण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने उद्भव प्रकल्पाचा आराखडा तयार केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी दिली होती. आपण आपला लष्करी वारसा शोधत जाऊ, तसे अशा प्रकारचे प्रकल्प सातत्याने हाती घ्यायला हवेत, हे लक्षात येते. प्रचंड अनुभव, बलिदान आणि कडव्या लढाईतील भारतीय सशस्त्र दलांचे विजय आपल्या सामारिक संस्कृतीला आकार देत राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR