चाकूर : प्रतिनिधी
उपविभागीय पोलीस पथकानी दि. २२ मार्च रोजी दुपारी अतिक्रमण विरोधी कारवाई करीत रहदारीस अडथळा होईल असे अतिक्रमण काढून टाकले. तसेच रहदारीस अडथळा होईल असे अतिक्रमण व्यापारी यानी करू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी केले आहे.
नवे बसस्थानक समोरील रस्त्यावर फळविक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांनी रहदारीस अडथळा होईल असे अतिक्रमण केलेले होते. तसेच बोथी रस्त्यावर ही दोन्ही बाजूने अतिक्रमण झालेले होते. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने अपघात होण्यांची शक्यता निर्माण झाली होती. संबधीताना लेखी आणि तोंडी सुचना दिल्या होत्या. मात्र अतिक्रमण हटवले नव्हते. २२ मार्च रोजी उपविभागीय पोलीस पथकानी दुपारी अतिक्रमण विरोधी कारवाई करीत रहदारीस अडथळा होईल असे अतिक्रमण काढून टाकले. तसेच रहदारीस अडथळा होईल असे अतिक्रमण व्यापारी यानी करू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांनी केले आहे.