20.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रउमेदवारी मागे घेण्यासाठी ५ ते १५ कोटींची ऑफर

उमेदवारी मागे घेण्यासाठी ५ ते १५ कोटींची ऑफर

राज ठाकरे यांचा भाजप महायुतीवर पुन्हा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
कल्याण डोंबिवलीत भाजपची माणसे पैसे वाटतात आणि त्यांना शिंदेंची माणसे पकडून मारतात, ही अशी अवस्था आपण पाहत आहोत. यांनी जर विकास केला असता तर त्यांना मताला पाच-पाच हजार का द्यावे लागत आहेत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कल्याण डोंबिवलीत भाजपने ठाकरेंच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी ५ ते १५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. असे असतानाही न विकले जाता आमचे उमेदवार लढत आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी ते सगळे उमेदवार लोकांच्या समोर आणले.

ठाण्यात ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या काही उमेदवारांना समोर आणले. भाजपकडून मताला पाच हजार दिले जात आहेत. मला देणा-यांची चिंता नाही तर घेणा-यांची चिंता आहे. उद्या यांची मुले काय म्हणतील, आमचे आई-वडील पाच-पाच हजारांना विकले गेले, असे राज ठाकरे म्हणाले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेल्या बिनविरोध निवडीवर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, पूर्वी जसा गुलामांचा बाजार मांडला गेला, तसा बाजार आता कल्याण-डोंबिवलीमध्ये मांडला गेला. एकेका उमेदवाराला पाच-पाच कोटी रुपये ऑफर देण्यात आली.

आपल्या पक्षाचे शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि पूजा धात्रक हे एकाच कुटुंबातील तिघेजण निवडणुकीला उभारले आहेत. त्यांना प्रत्येकी पाच कोटी अशी १५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. तरीही १५ कोटींची ऑफर नाकारून ते तिघेही निवडणुकीला उभे राहिले. दुसरे उमेदवार राजश्री नाईक… त्यांना पाच कोटींची ऑफर देण्यात आली. सुशील आवटे यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, ती त्यांनी नाकारली, असे राज ठाकरे म्हणाले.

कुठून येतो हा पैसा?
कुठून येतो हा पैसा, काय चालले आहे? हे फक्त दोन तीन जण समोर आले आहेत, यांना देण्यासाठीचे पैसे कुठुन येताहेत, इतकी वर्षे आम्ही निवडणूक पाहत आहोत, अशी निवडणूक पाहिली नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
१ हजार कोटीची जमीन
उद्योगपतीला देण्याचा घाट
एका उद्योगपतीला ठाण्यातील एक हजार कोटींची जमीन द्यायचा घाट एकनाथ शिंदे यांनी घातला होता. ती जमीन वनखात्याची होती, त्यामुळे गणेश नाईकांनी त्यांचा डाव हाणून पाडल्याचे राज ठाकरे म्हणाले.

ज्याने शिवसेनेशी गद्दारी केली
तोच ठाण्याशी गद्दारी करतोय
ज्या माणसाने शिवसेनेशी गद्दारी केली, तोच माणूस ठाण्याशी गद्दारी करत आहे. हजार एकर जमीन त्यांनी देऊन टाकली. बाहेर पडल्यावर महसूलमंत्री बावनकुळे म्हणतात ही जमीन माहिती नाही. ज्याने शिवसेनेशी गद्दारी केली, तोच माणूस आता ठाण्याशी गद्दारी करीत आहे. उद्या जर काही झाले तर ठाण्यातील गद्दार येथून फाईव्ह स्टार शेतात हेलिकॉप्टर घेऊन निघून जाईल. देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला, तिसरे जातील काका मला वाचवा म्हणत बारामतीला, असा हल्लाबोल करीत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. गेली २५ वर्षे मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिली, ठाणे शिवसेनेकडे दिले, गद्दाराकडे दिले नव्हते. हा गद्दार निघेल तुम्हाला आणि मलाही माहित नव्हते. तुम्ही फसलात मीही फसलो, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR