सांगली : प्रतिनिधी
सध्या उन्हाळा सुरू झाला असून फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकताना दिसून येत असून सांगली ( जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उष्माघाताच पहिला बळी झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली शहरातील हिराबाग कॉर्नर येथे आईसक्रीम विक्रेत्या व्यक्तीला उष्माघाताने भोवळ आली, त्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाने फेब्रुवारी महिन्यातच पस्तीशी ओलांडली असून सोलापूर व नागपूरमध्ये तापमान ३८अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे.
सांगली जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून या रखरखत्या उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या होऊन एका परप्रांतीय गॅरेगार विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना हिराबाग कॉर्नर येथे घडली आहे. हिराबाग कॉर्नर येथील वॉटर हाऊसजवळ रखरखत्या उन्हाचा त्रास होऊन आईस्क्रीम गोळे विकणा-या एका व्यक्तीचा रक्ताच्या उलट्याहोऊन मृत्यू झाला. रामपाल असे या व्यक्तीचे नाव अआहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक माहितीसाठी त्यांचा मृतदेह सांगलीतील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
पुढील काही दिवसांत तापमानात वाढ
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या ३ ते ४ दिवसांत किमान व कमाल तापमानात २-३अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. सोलापूर आणि नागपूरमध्ये तापमानाने ३५ अंश सेल्सियसचा आकडा पार केला आहे. दरम्यान, यंदा शाळेसाठी उन्हाळ्याच्या सुट्या ४५ दिवसांच्या जाहीर करण्यात आल्या आहेत.