पुणे : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून आजवर २०० पैकी १९२ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत तर ८०२.६५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आली आहे साधारणपणे येत्या १० ते १५ एप्रिल पर्यंत हंगाम संपण्याची चिन्हे आहेत.
यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील ९९ सहकारी आणि १०१ खासगी साखर कारखान्यांनी हंगाम घेतला होता त्यातील १९२ साखर कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत. तर साखर उतारा ९.४७ टक्के मिळाला आहे तसेच ८४७. ७९ लाख मे टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे .सर्वाधिक बंद झालेले साखर कारखाने हे सोलापूर विभागातील ४५ तर त्या खालोखाल ४० कारखाने कोल्हापूर विभागातील आहेत राज्यात सर्वाधिक साखर उतारा हा कोल्हापूर विभागात ११.०९ इतका मिळाला आहे तर सर्वाधिक खासगी साखर कारखाने हे सोलापूर विभागात २८ इतके आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे