31.4 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करा

ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करा

महिलांच्या समस्यांचे निराकरण शक्य : गो-हे
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. त्यासंबंधी कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज पुन्हा बैठक घेतली. या बैठकीत उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी ऊसतोड कामगार महामंडळ आणि सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करावा, असे आदेश दिले.

ऊसतोड कामगारांसाठीच्या या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळेल, असा विश्वास गो-हे यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या व समिती अहवालाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देशही डॉ. गो-हे यांनी दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR