17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रऊस तोडणी यंत्र अनुदानाच्या नावाखाली शेतक-यांची लूट

ऊस तोडणी यंत्र अनुदानाच्या नावाखाली शेतक-यांची लूट

कराडचा कारनामा, बारामतीच्या शेतक-यांचीही फसवणूक
पुणे : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडचे अनेक काळे कारनामे समोर आले आहेत. त्याने शेतक-यांना पंढरपूरमधील शेतक-यांना ऊस हार्वेस्टिंग करणा-या मशीनसाठी अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. त्यातच आता बारामती मतदारसंघातील काही शेतक-यांचीही त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शेतक-यांना अनुदान मिळवून देण्यासाठी त्याने शेतक-यांकडून प्रत्येकी आठ-आठ लाख रूपये घेतल्याची तक्रार शेतक-यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.

परळीतील वाल्मिक कराडने ऊसतोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाच्या आमिषाने फसवणूक केलेल्या बारामतीतील शेतक-यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना सर्व घटना सांगितली. हार्वेस्टर घेतलेल्या शेतक-यांना अनुदान मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराडने प्रत्येकी शेतक-यांकडून आठ-आठ लाख रुपये घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या शेतक-यांना अनुदान मिळाले नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत, अशी तक्रार फसवणूक झालेल्या शेतक-यांनी केली.

खा. सुळेंनी पोलिस
अधीक्षकांना फोन
हा प्रकार समोर येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन केला. त्यांना या प्रकरणाची चौकशी करत शेतक-यांना न्याय द्या, अशी मागणी केली. केंद्र सरकारच्या वतीने ऊसतोडणी मशिनसाठी देण्यात येणारे ४० टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून वाल्मिक कराडने ही फसवणूक केल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

रक्कम लाटली आणि
फक्त आश्वासने दिली
बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी व हार्वेस्टर मालक रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी मुंडे यांचे कराड हे निकटवर्तीय असून, ते तुम्हाला प्रत्येकी ३६ लाख रुपये अनुदान मिळवून देतील, त्यासाठी प्रत्येकी ८ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते. पैसे दिल्यानंतर अनुदान कधी मिळणार याची कराडकडे चौकशी करत होते. त्यावेळी वाल्मिक कराडकडून वारंवार आश्वासने दिली जात होती, अशी माहिती सुळेंना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR