24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरऋचा रुपनर आत्महत्येप्रकरणी डॉक्टर पती अन् सासऱ्यास अटक

ऋचा रुपनर आत्महत्येप्रकरणी डॉक्टर पती अन् सासऱ्यास अटक

सांगोला : सांगोला येथील डॉ. ऋचा रुपनर-पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्टर पती व सासऱ्यास अटक आली करण्यात आहे. अटकेतील आरोपी पिता-पुत्रास सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश के. बी. सोनवणे यांनी डॉ. सुरज भाऊसाहेब रुपनर यास १७ जूनपर्यंत आणि भाऊसाहेब आनंदा रुपनर यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सांगोला येथील फॅबटेक उद्योग समूहाचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांची सून डॉ. ऋचा सुरज रुपनर पाटील यांनी गुरुवार ६ जून रोजी पहाटे ३:३०च्या सुमारास फॅबटेक कॉलेज शेजारील राहत्या बंगल्यातील डायनिंग हॉलमधील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत डॉ. ऋचाचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील (रा. पंढरपूर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रथमदर्शनी पती डॉ. सुरज भाऊसाहेब रुपनर याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. सुरज रुपनर फरार होता, तर ऋषिकेश पाटील यांच्या पुरवणी जबाबावरून पोलिसांनी डॉ. ऋचाचे सासरे भाऊसाहेब रुपनर व सासू सुरेखा भाऊसाहेब रुपनर यांची नावे नमूद केली होती.

ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप, सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, सचिन वाघ, बाबासाहेब पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी, रमेश कांबळे, मारुती पांढरे यांच्या पथकाने केली. भाऊसाहेब रुपनर यांना ११ जून रोजी रात्री कोल्हापूर येथून ताब्यात घेतले व त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केली तर आरोपी डॉ. सुरज रुपनर याच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिस पथकाने सांगोला-मिरज हायवेवरील अनकढाळ टोल नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी सासू सुरेखा रुपनर यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR