24.5 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeउद्योग‘एआय’ने डिझाईन केलेली चिप आकलनापलीकडची!

‘एआय’ने डिझाईन केलेली चिप आकलनापलीकडची!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
‘एआय’च्या साहाय्याने सध्या अनेक थक्क करणारी कामगिरी होत आहे. आता तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ‘एआय’ने अशा गुंतागुंतीच्या वायरलेस चिप्सचे काही तासांमध्येच डिझाईन बनवले जाऊ शकते, जे माणसाने बनविण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. तसेच ‘एआय’ने बनवलेल्या चिपचे पूर्णपणे आकलन करणे कधी कधी माणसालाही शक्य होणार नाही! मात्र या चिपच्या साहाय्याने कामे अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतील.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एखादा मानव सर्किट डिझायनर चिपचे डिझाईन बनवत असताना जो विचार करील त्यापेक्षा वेगळा विचार करून ‘एआय’कडून अधिक सरस चिप बनवली जाऊ शकते. हे संशोधन ‘मिलीमीटर-वेव्ह (एमएम-वेव्ह) वायरलेस चिप्स’वर लक्ष केंद्रित करणारे आहे.

सध्या अशा चिप्स त्यांच्या गुंतागुंतीमुळे अनेक समस्या निर्माण करीत आहेत. त्यांचे लघुकरण होणेही गरजेचे आहे. अशा चिप्स ५-जी मोडेम्समध्ये वापरल्या जातात, जे सध्याच्या फोनमध्ये असतात. आता प्रिन्सटोन इंजिनिअरिंग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधकांनी म्हटले आहे की डीप-लर्निंग-बेस्ड एआय मॉडेल्स वेगळी डिझाईन पद्धत वापरून अधिक सरस चिप बनवू शकते.

प्रिन्सटोनमधील इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्राध्यापक कौशिक सेनगुप्ता यांनी सांगितले की, ‘एआय’ने डिझाईन केलेल्या अशा चिप्स खरोखरच मानवी बुद्धीने समजण्याच्या पलीकडच्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR