17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरएकजुटीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार

एकजुटीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेस महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे.  राज्यात परिवर्तन घडवून, महाराष्ट्र विधानसभेवर आघाडीचा झेंडा फडकवणार आहे, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यांच्याशी संवाद साधताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्य्क्त  केला.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी लातूर शहरातील प्रभाग ३ मधील राजीवनगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लातूर शहर जिल्हा प्रमुख सुनील बसपुरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांच्या लातूर शहरातील शारदानगर येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याशी लातूर शहर विधानसभा निवडणुकीतील विविध विषयावर चर्चा केली. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विष्णुपंत साठे, बालाजी जाधव, माधव गलमुगळे, माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, वर्षा मस्के, प्रवीण सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, शिवाजी बसपुरे, इम्रान सय्यद, मोहन सुरवसे, यशपाल कांबळे, पद्माकर पेंढारकर, राजू गवळी, तनुजा कांबळे, राहुल डुमणे आदिसह काँग्रेस महाविकास आघाडीतील आजी, माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते बसपुरे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. त्यावेळी माजी महापौर दीपक सुळ, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, चांदपाशा इनामदार, माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, सत्तारशेख, शेखर हविले, प्रवीण साळुंके, युनूस मोमीन, रत्नदीप अजनीकर, फैसलाखान कायमखानी, रघुनाथ मदने, असरेश्वर शितोळे, बसवेश्वर रेकुळगे, इरफान शेख, अ‍ॅड. प्रदीप पाटील, अनिता साळुंके, कल्पना फरकांडे, विनायक शिंदे, उमाकांत नाईकनवरे, सरिता पाटील, युवराज बन, ख्वॉजा मणियार, मनीषा कोकणे, प्रवीण सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, इम्रान सय्यद, पवन सोलंकर, विजय टाकेकर आदिसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतील आजी, माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते मणियार कुटुंबीय मित्रपरिवार  उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता सुरु झाल्या आहेत. लातूरला मराठवाड्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे, लातूर ही मराठवाड्याची शान आहे. लातूरकर म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे, महाराष्ट्राला एक कणखर सरकार द्यायचे औपचारिक प्रचाराला आम्ही आज सुरुवात केली आहे. लातूरचा सूर्योदय हा पूर्वीकडून होत आहे म्हणून लातूर महाविकास आघाडीने पूर्व भागातून सुनील  बसपुरे निवासस्थानी भेट देऊन महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.
अनेक राजकीय पक्ष येतील खोटेनाटे आरोप करतील ते सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खोडून काढावे, अफवा भुलथापाना बळी पडू नका, आम्ही आपली प्रामाणिकपणे सेवा करण्याचे काम केले आहे. लातूरतील गुन्हेगारी संपुष्टात आणायची आहे, सावकारी पण संपुष्टात आणायची आहे, लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरला आपलं घर मानलं तसेच लातूरकरांनी त्यांना कुटुंबप्रमुख मानलं त्याप्रमाणे लातूर हे माझं घर आहे सर्वधर्मसमभावाची भूमिका काँग्रेस पक्षाने कायम निभावली आहे, असे सांगून त्यांनी महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन केले.
यानंतर राजा मणियार  यांच्या लातूर शहरातील शारदानगर येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहरात महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रात आपणाला परिवर्तन घडवायचे आहे. लोकसभा निवडणूक इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लढलो. आता विधानसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. लातूरला आपणाला खूप पुढे घेऊन जायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा असली पक्ष आहे. हे जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले. त्याप्रमाणेच ते विधानसभा निवडणुकीतही दाखवून देतील. असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की आपण लातूरकर म्हणून लातूर साठी झटत असतो लातूरच्या किल्लारी येथील भूकंपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खूप मदत केली. लातूरला मुख्यमंत्रीपद लोकनेते विलासराव देशमुख यांना जे मिळाले ते शरदचंद्र पवार यांच्या सहकार्यमुळेच मिळाले. महाविकास आघाडी ही पाच वर्षासाठी नसून ती पुढील पाच २५ वर्षासाठी आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपणाला विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे. मी लातूर जिल्ह्याचा तत्कालीन पालकमंत्री असताना महाविकास आघाडीला जिल्ह्यात अधिक सन्मान दिला. यापुढेही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला समान न्याय मिळेल, असे ते म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, लातूर  महानगरप्रमुख सुनील बसपुरे यांनी मनोगत व्यक्त करुन आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचा धर्म पाळू लातूर शहराला सुरक्षित ठेवण्याचे काम लोकनेते विलासराव देशमुख यांनी केले तीच परंपरा माजी मंत्री आमदार अमित देशमुख पुढे चालवत आहेत  त्यांना या मतदारसंघातून एक लाखाची लीड मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR