19.3 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ

एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ

थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा कलम १२६ नुसार एफआयआर दाखल करण्याचे निर्देश साकीनाका पोलिस स्टेशनला द्यावेत, अशी लेखी तक्रार मविआचे उमेदवार नसीम खान यांचे मुख्य पोलिंग एजंट गणेश चव्हाण यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी ४८ तास इतर मतदारसंघातील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वत:च्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदारसंघात प्रवेश करण्यास मनाई आहे.

असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी मतदान सुरूअसताना म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास काजुपाडा घास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूल भागात रोड शो काढून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो काढलेल्या भागात अनेक मतदान केंद्रे आहेत. हा आदर्श आचारसंहितेचा उघड भंग असून ही अनधिकृत उपस्थिती गंभीर चिंता निर्माण करणारी तसेच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीला बाधा पोहोचवणारी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR