27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका

एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका

लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

जालना : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. काल रात्री आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना यथेच्छ प्रसाद दिला. आमच्या अंगावर कोणी आले तर आम्ही त्यांना शिंगावर घेणार, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, रात्री एकच्या आसपास चार तरुण आले आणि दोन तरुणांनी स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमच्या तरुणांनी त्यांना प्रसाद दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे हे रात्रीच्या घटनेने सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जीवे मारायचे आहे. एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना यथेच्छ प्रसाद दिला. आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांना शिंगावर घेणार आहे.

हाकेंचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल
लक्ष्मण हाके म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही एकदा महाराष्ट्राचे भ्रमण करा. पृथ्वीराज बाबा चव्हाण वर्षानुवर्षे मोठमोठी पदे तुम्ही भोगली आहेत. महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार आहे? ओबीसी भटके कुठे, कुठल्या भागात राहतात हे तुम्हाला माहिती आहे का?

हाकेंची संभाजीराजेंवर टीका
संभाजीराजे छत्रपतींवर देखील हाकेंनी टीका केली आहे. हाके म्हणाले, एकदा जनतेला कळू द्या राजा किती लायकीचा आहे. राजा १२-१३ कोटी जनतेचा पाहिजे. वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा आहे. कोण राजा, कुठला राजा, आम्ही फक्त त्यांना राजा म्हणायचे. त्यांचे काही उत्तरदायित्व नाही का?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR