15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeलातूर‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात उदगीरकरांनी वाचला समस्यांचा पाढा

‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात उदगीरकरांनी वाचला समस्यांचा पाढा

उदगीर : बिभिषण मद्देवाड
उदगीर नगर परिषद  निवडणूकीच्या  पार्श्वभूमीवर  ‘एकमत’चा   शो झाला. यावेळी नागरीकांनी अभिव्यक्त होत समस्यांचा पाढाच वाचला. नगर परिषद परीसरात झालेल्या शो वेळी  शहरातील सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उदगीर शहर महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवर वसलेले  ऐतिसिक शहर आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे.  मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. उदगीरच्या विकासाच्या नावावर राजकारण झाले परंतु आजही  अनेक समस्या  उदगीरकरांच्या पुढे आहेत. विकास  आम्हीच  करु, असे सांगत काँग्रेस, भाजपा या पक्षांनी आलटून पालटून सत्तेचा उपभोग घेतला परंतु विकासाच्या वाटेत येणा-या समस्या मात्र अद्याप कोणीही  दूर करू शकले नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडतील, अशा नगरसेवक नगराध्यक्षाची नगरपालिकेत  निवडून यावे, अशी अपेक्षा उदगीरकरांनी एकमतकडे  दाखवले.
उदगीर शहरात रहदारीचा व अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नगरपालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता येवो  सत्तेत आल्यानंतर या समस्याकडे गांभीर्याने  पाहिले गेले  नाही, कारण सत्तेत असलेल्या नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे अतिक्रमण करणा-या व्यक्ती व  रहदारीला अडचण करणा-या व्यक्ती यांचे लागे लागेबांधे असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्व. विलासराव देशमुख चौक, बिदर रोड वसंतराव नाईक चौक, उमा चौक व मोंढा रोडला अतिक्रमण झाल्याने नागरिकांना चालले ही कठीण होते. मात्र सातत्याने नागरिक आणि पत्रकारांनी याबद्दल आवाज उठवूनही  याकडे सत्ताधा-यांनी दुर्लक्ष केल्याने उदगीरातील नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे आणि हाच मुद्दा इलेक्शनमध्ये महत्त्वाचा ठरणार असल्याचे  नागरीकांनी बोलले  उदगीरात वाढलेल्या श्वानांची संख्या व त्या श्वानांनी अनेकांना घेतलेला चावा याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जाणार आहे. त्यामुळे मागील एक ते दीड वर्षाच्या काळात श्वानांनी अनेकाला चावा घेतला परंतु कोणत्याही इच्छुक नगरसेवकांनी याबद्दल  भ्र शब्दही काढला नसल्याने भावी नगरसेवकांचे भविष्य याच विषयावर ठरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. पक्ष व चांगल्या उमेदवारापेक्षा जात व धर्म हाच वरचढ होणार असल्याचे चित्र उदगीर दिसत आहे. त्यामुळे आतापासूनच जातीच्या व धर्माच्या समीकरणावर उमेदवाराला विजयी ठरवले जात आहे. त्यामुळे  जात व धर्माच्या नावावर राजकारण नको , अशी भावना बोलून दाखवल्या.
नगरपरिषदेने घरपट्टी व नळपट्टी दुप्पट केल्याने उदगीरातील नागरिकावर मोठा आर्थिक ताण पडत आहे. त्यामुळे जे कोणी सत्तेमध्ये आल्यानंतर वाढलेली पाणीपट्टी व घरपट्टी   कमी करण्याची हमी देईल त्या  उमेदवारांना  निवडून देणार असल्याचा सुर निघाला. नगर परिषदेचे  बगीचे, ग्रंथालय अद्याप बंद असल्याने ते लवकरात लवकर उघडची मागणी यावेळी नागरिकांतून केली. नगरपालिकेचे ऑफिस चौथ्या मजल्यावर. नगरपालिकेचे ऑफिसचे चौथ्या मजल्यावर असल्याने वृद्ध व्यक्तीसह कामाला येणा-या नागरिकांना मोठ्या अडचणींचा  सामना करावा लागत आहे. त्यामुळे ऑफिस पहिल्या मजल्यावर करावी, अशी मागणी यावेळी बोलून  दाखवली.  उदगीर सर्व परिसरात असलेल्या अशोकनगर, महात्मा फुलेनगर, महात्मा गांधीनगर या नगरातील नागरिकांची घरे नावावर करावी, अशी मागणी यावेळी काही नागरिकांनी केली. तसेच उदगीर शहरातील मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली असून मागील पाच वर्षापासून वेगवेगळ्या कारणासाठी फोडलेले रस्ते अद्याप दुरुस्त केले गेले नसल्याने जे कोणी करतील त्यांच्या पाठीशी राहू, असे शब्द यावेळी मतदाराने दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR