18.9 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरएकाच दिवसात पोलिसांकडून धाडी; ५०.६८ लाखांचा ऐवज जप्त

एकाच दिवसात पोलिसांकडून धाडी; ५०.६८ लाखांचा ऐवज जप्त

लातूर : प्रतिनिधी
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे ५०.६८ लाखाची देशी-विदेशी दारू, हातभट्टी, वाळू, मटका साहित्य, वाहनं असा ऐवज जप्त करून ११ गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथके तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. दरम्यान ८ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका, देशी-विदेशी दारू, हातभट्टी व वाळू यांची अवैध विक्री व्यवसाय करणा-यावर कारवाई करत एकूण ११ गुन्हे दाखल केले असून मटका, दारू, हातभट्टी व वाळू तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ५० लाख ६८ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवैध धंदे करणा-या एकूण १२ लोकाविरुद्ध कार्यवाही करण्यात आली असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची  कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पोलीस पथकांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR