लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेने नाविन्यपुर्ण संकल्पनेतून ७८६ ग्रामपंचायतींनी घरपट्टी व पाणी पट्टी कराची वसुली करण्यासाठी चार टप्यात विशेष कर वसुली दिन मोहिम राबवली जात आहे. पहिल्या टप्यात १ कोटी ५१ लाख ६७ हजार रूपयांची कर वसूली झाली. तर दुस-या टप्यात १ कोटी ६७ लाख २९ हजार रूपयांची कर वसूली झाली. आजपर्र्यत ७८६ ग्राम पंचायतींनी पाणीपट्टी व घर पट्टीची ५६ कोटी १८ लाखाची वसूली केली आहे.
लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीची २०२४-२०२५ या वर्षाची कर ७४ कोटी ९२ लाख ७२ हजार रूपयांची घरपट्टी व पाणी पट्टीची मागणी होतीे. ग्रामपंचायतींनी फेब्रुवारी अखेर पर्यंत ५२ कोअी ९९ लाख १८ हजार रूपयांची घरपटटी व पाणी पटटीच्या रूपाने कराचा भरणा नागरीकांनी केला आहे. उर्वरीत कराचा भरणा करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने कर वसूलीसाठी चार टप्पे निश्चित केले. या चार टप्यात पहिला टप्पा १० मार्च रोजी राबविण्यात आला. यात १ कोटी ५१ लाख ६७ हजार रूपयांची कर वसूली झाली. तर दुसरा टप्पा दि. १७ मार्च रोजी राबविण्यात आला. या दुस-या टप्यात १ कोटी ६७ लाख २९ हजार रूपयांची कर वसूली झाली आहे. लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी व घर पट्टीची ५६ कोटी १८ लाखाची वसूली केली आहे. अजूनही ग्रामपंचायतींच्याकडे १८ कोटी ७४ लाख रूपयांची कराची थकबाकी वसूल होणे बाकी आहे.