38.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeमहाराष्ट्रएक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होईन; अजित पवारांनी पुन्हा व्यक्त केली इच्छा

एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होईन; अजित पवारांनी पुन्हा व्यक्त केली इच्छा

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप राज्याचे मुख्यमंत्री झाले नसतील, पण त्यांनी आशा सोडलेली नाही. एक दिवस ते निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वासच त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित महाराष्ट्र महोत्सव सोहळ्यात अजित पवार यांनी यावर भाष्य केले. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, ‘आता राज्यात एका महिलेला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळायला हवी. यावर अजित पवार म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे पण त्यासाठी योग येणे आवश्यक आहे.

अजित पवार म्हणाले की, ‘मलाही वाटते मीही मुख्यमंत्री व्हावे पण मला अजून संधी मिळालेली नाही. तथापि, धाकट्या पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सांगितले की, एक दिवस नक्कीच येईल जेव्हा ते देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवतील.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत आणि अजित पवार देखील जोपर्यंत भारतीय जनता पक्षासोबत आहेत, तोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत. जर हे दोन्ही पक्ष भाजपमध्ये विलीन झाले तर ते कदाचित भाजपचे मुख्यमंत्री होतील. हे त्यांना अमित शहा यांनी देखील सांगितले असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिंदे-पवार गट जर भाजपमध्ये विलीन झाला तर
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गट जर भाजपमध्ये विलीन झाला तर सिद्धरामय्यासारखे ते भाजपचे एक मुख्यमंत्री होऊ शकतात. तसे झाले तरच एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात, हे मी आधीच सांगितले आहे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच : जयंत पाटील
ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मुख्यमंत्री होणे पाच वर्षे शक्य नाही. पण तरीही ते मुख्यमंत्री झालेच तर आम्हाला आनंद आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते वेगवेगळ्या बैठका आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR