लातूर : प्रतिनिधी
लातूर परिमंडळ कार्यालय, एमआयडीसी येथून सकाळी ६.३० वाजता प्रभारी मुख्य अभियंता प्रशांत दाणी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केलेली मॅरेथॉन पीव्हीआर चौक ते परत परिमंडळ कार्यालय या मार्गाने धावत सांगता करण्यात आली. शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन महावितरणने आयोजीत केलेली ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉन ३५० धावपट्टूंच्या धावेने उत्सहात संपन्न झाली.
बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रमूख उपस्थितीत महावितरणच्या लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभाग, शाखा कार्यालयाचे अभियंते जनमित्र यांच्यासह मानव संसाधन, वित्त व लेखा विभाग, औद्योगिक संबंध विभाग, जनसंपर्क विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, विधी विभागव स्थापत्य विभागातील ३५० ते ४०० अधिकारी कर्मचा-यांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवला.
आपला २० वा वर्धापनदिन दि. ६ जून रोजी साजरा करत आहे. या निमित्ताने येत्या दि. १ ते ६ जून या कालावधीत राज्यभरात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमांद्वारे विद्युत सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. लातूर परिमंदलात या सप्ताहाची सुरुवात रविवार, १ जून रोजी ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनच्या आयोजनाने करण्यात आली.
मॅरेथॉनच्या नंतर गॅलक्सी हॉस्पीटल यांच्या सहकार्याने कार्यक्रमस्थळी उपस्थितांसाठी आरोग्य तपासणि शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात तज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब आणि रक्त साखरेची तपासणी करण्यात आली. मॅरेथान यशश्वीतेसाठी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, सहाय्यक महाव्यवस्थाक (मासं) चेतन वाघ, वरिष्ठ व्यवस्थापक जालींदर मंगळवेढे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.