29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeराष्ट्रीयएनडीएचे नेते संपर्कात

एनडीएचे नेते संपर्कात

राहुल गांधी यांचा गौप्यस्फोट, सरकार कमकुवत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
२०२४ ची लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली. एनडीएने बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन केले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तर इंडिया आघाडीला विरोधात बसावे लागले. अशातच राहुल गांधी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत एनडीए आघाडीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एनडीएचे लोक आमच्या संपर्कात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी अनपेक्षित निवडणुकीच्या निकालानंतर भारतातील राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल, तसेच भाजपच्या खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे एक छोटीशी गडबड सरकारला अडचणीत आणू शकते, असेही म्हटले. सध्याच्या मोदी सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्यामुळे एनडीएतील काही लोक आमच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी धार्मिक तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतातील मोठ्या मुस्लिम अल्पसंख्याकांना घुसखोर म्हटले आहे.

आयोध्येतच नाकारले
आम्ही पाठीमागे हात बांधून लढलो. भारतीय जनतेला, गरीब जनतेला, त्यांना नेमके काय करायचे आहे हे माहीत होते. न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना हे सर्व विरोधकांसाठी बंद होते. त्यांनी गेली १० वर्षे अयोध्येच्या मुद्यावर प्रचार केला. परंतु त्यांना अयोध्येने नाकारले. यंदा एनडीए आघाडी कमकुवत असून सत्ता टिकवण्यासाठी भाजपला छोट्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR