कानपूर : वृत्तसंस्था
कानपूरमध्ये स्वत:ला एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून मिरवणा-या डीएसपी ऋषिकांत शुक्ला यांच्यावरील कारवाईमुळे उत्तर प्रदेश पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटी तपासामध्ये शुक्ला यांच्याकडे १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. ही संपत्ती त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, शुक्ला लोकांना वारंवार एनकाउंटरमध्ये उडवून देण्याची धमकी देत असत आणि याच भीतीचा आधार घेऊन ते लोकांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेत.
कानपूरमध्ये स्वत:ला एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून मिरवणा-या डीएसपी ऋषिकांत शुक्ला यांच्यावरील कारवाईमुळे उत्तर प्रदेश पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटी तपासामध्ये शुक्ला यांच्याकडे १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. ही संपत्ती त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
एसआयटीच्या अहवालानुसार, ऋषिकांत शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण १२ ठिकाणी ९२ कोटी रुपयांची मालमत्ता आढळली आहे. यामध्ये लखनऊ, कानपूर, फतेहपूर, इटावा आणि मैनपुरी येथील जमिनी, आलिशान बंगले, फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे. अनेक मालमत्ता अजूनही एसआयटीच्या ताब्यात आलेल्या नाहीत, कारण त्या नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर खरेदी केल्या गेल्या आहेत.

