22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरएन. ए. थकवला मनपाने; दुकाने केले सील व्यवसायिकांची

एन. ए. थकवला मनपाने; दुकाने केले सील व्यवसायिकांची

लातूर : प्रतिनिधी
अकृषिक वाणिज्य कर (एन. ए.) लातूर शहर महानगरपालिकेने भरला नाही. या कराची महानगरपालिकेकडे थकबाकी असताना लातूर तहसील कार्यालयाच्या वतीने शहरातील गांधी चौकातील महानगरपालिकेच्या मालकीच्या १९ दुकाने, हॉटेलस्ना दि. १४ मार्च रोजी सकाळी सील ठोकले. या कारवाईमुळे व्यापा-यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लातूर शहर महानगरपालिकेकडे तहसील कार्यालयाचा अर्थात शासनाचा १ कोटी ७२ लाख रुपये अकृषिक वाणिज्य कर (एन. ए.) कर थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी लातूर तहसील कार्यालयाने लातूर शहर महानगरपालिकेची मालमत्ता म्हणून शहरातील महात्मा गांधी चौकातील १९ दुकाने, हॉटेलस् यांना गुरुवारी सकाळी दुकाने उघडण्याअधीच सील ठोकले आहे. वास्तवीक ही दुकाने, हॉटेलस्चालकांकडे अकृषिक वाणिज्य कर (एन. ए.) ची कोणतीही थकबाकी नाही. हे सर्व महानगरपालिकेचे भाडेकरु आहेत्.ा कालच महानगरपालिकेल्या अधिका-यांनी भाड्यापोटी थकीत रकमेचे धनादेश घेऊन गेले आहे. महानगरपालिकेने तहसीलकडे अकृषिक वाणिज्य कर (एन. ए.) भरणे आवश्यक असताना व्यापा-यांची दुकाने सील केल्याने व्यापा-यांत तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR