22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरएन. सी. सी. कॅडेटसनी केला गोळीबार सराव

एन. सी. सी. कॅडेटसनी केला गोळीबार सराव

लातूर : प्रतिनिधी
५३ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना यांच्या अधिपत्याखाली सुरु असलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबीरात विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण यांच्या सहाय्याने सर्पमित्र राहुल कांबळे यांनी कॅडेट्सना सर्पाचे प्रकार, सर्प दंश झाल्यास प्रथम उपचार, प्रात्याशिक करुन माहिती दिली. खंडापूर येथील मुलींचे वस्तीगृह येथे हे शिबीर होत आहे.
याप्रसंगी कमान अधिकारी तथा कैम्प कमांडट, लेफ्टनंट कर्नल हेमंत जोशी, कर्नल वाय. बी. सिंह, प्रशासकिय अधिकारी तथा डेपुटी कैम्प कमांडट, कॅम्प मधील ४५० कॅडेटस शाळा व महाविद्यालय नियुक्त एन. सी. सी. अधिकारी भारतीय सैन्य दलातील प्रशिक्षक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणादरम्यान ०.२२ रायफलची ४५० कॅडेट्सचा गोळीबार सराव हा बीएसएफ  ट्रेनिंग सेंटर येथे डेपुटी कैम्प कमांडट लेफ्टनंट कर्नल बाय. थी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या एकूण चार तुकड्यांमध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यातील ४५० एन. सी. सी. कैडेट्स मुला-मुलींनी गोळीबार सराव केला.
कॅम्पच्या यशस्वीतेसाठी कमान अधिकारी कर्नल हेमंत जोशी व प्रशासकिय अधिकारी वाय. बी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुबेदार मेजर शंभू सिंग, सुभेदार शेखर थोरात, सुभेदार शेख पाशा, सुभेदार उत्तम पाटील, सुभेदार हरिंदर सिंग, नायब सुभेदार बाजीराव पाटील, लेफ्टनंट अतिश तिडके, लेफ्टनंट गुणवंत ताटे, थर्ड ऑफिसर सिद्दिकी जे. के., मकरंद पाटील, बी. एच. एम. योगेश बारसे, हवालदार अजमेर सिंग, बी. व्ही. घोगरे, आर. आर. पवार तसेच प्रशिक्षक स्टाफ हे कॅम्पच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR