वलांडी : प्रतिनिधी
केंद्र शासनाने एफ.आर.पी.चे दर वाढवले पण साखरेचे व ऊत्पादीत मालाच्या भाववाढीत खोडा घालण्याचे काम सरकारने कौशल्याने केले असल्याची टिका जागृती शुगरचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली. ते देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अॅड अलाईड ईंडस्ट्रीजच्या १३ व्या गाळप हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते
मंचावर जागृतीचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बॅकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, गजानन भोपनीकर, मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, सुग्रीव लोंढे, सोनू डगवाले, मालवा घोनसे, बालाजी बोंबडे यांची प्रमुख उपस्थीती होती. माजी मंत्री दिलीपराव देशमूख म्हणाले की, सध्याचे शासन शेतक-यांच्या हितासाठी उदासीन भूमीकेत असून एकीकडे एफ. आर. पीचे भाव वाढवाचे मात्र दूसरीकडे साखरेचे दर मात्र वाढवायचे नाहीत. सोयाबीनसह उत्पादीत मालाच्या भाववाढीतही खोडा घालण्याचे कार्य सत्ताधारी शासन करीत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी जागृती शुगरने घेतलेल्या नूतन चार हार्वेस्टरचे पूजन माजी मंत्री सहकार महर्षी जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख व अन्य मान्यवरांंच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक जी. जी. येवले यांनी केले.
मागील वर्षी जागृतीने दैनंदिन ५००० मे.ट. गाळप करून ७ लाख २ हजार मे.टन गाळप केले दर २७६५ रूपयांचा भाव दिल्याचे त्यांनी सांगीतले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उस उत्पादक शेतक-यांनी जागृती शुगरकडे उस गाळपास द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी आभार प्रा. भगवान गायकवाड यांनी व्यक्त केले.