26.2 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्र‘एमआयटी एडीटी’त सजली जपानी संगीताची मैफिल

‘एमआयटी एडीटी’त सजली जपानी संगीताची मैफिल

पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या राज कपूर सभागृहामध्ये टोकियो हसेगावा यांच्या नेतृत्वाखालील जपानी म्युझिक ग्रुप ‘स्टोन म्युझिक’च्या जपान-भारत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक विनिमय उपक्रमांतर्गत जपानी संगीताच्या बहारदार मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

दीपप्रज्ज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या मैफिलीचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय, ललित कला व परफॉर्मिंग आर्टस्चे अधिष्ठाता डॉ. मिलिंद ढोबळे यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर परफॉर्मिंग आर्टस्च्या प्रभारी प्राचार्य डॉ. श्रेयसी पावगी, प्रा. तुषार पाणके, प्रा. महेंद्र पोतदार आदी उपस्थित होते.
मैफिलीची सुरुवात करण्यापूर्वी टोकियो हसेगावा यांनी भारतीय कलाकृतींबाबत व्याख्यानही दिले. ज्यामध्ये त्यांनी, भारतीय चित्रकलेतील प्रकार मिथिला आणि वार्ली चित्रे त्यांच्या काही विशिष्ट शैलींसह जपानमधील देखील आढळत असल्याचे नमूद केले. त्यानंतर त्यांनी आपल्या सहका-यांसह जपानी संगीताचा बहारदार नजराणा प्रेक्षकांसमोर सादर केला. यामध्ये मुख्यत: जपानी संस्कृतीवर आधारित संगिताचा प्रामुख्याने समावेश होता. विशेष म्हणजे या संगीतासाठी त्यांनी दगड, बांबू, गोरिला यांसारख्या जगभरातून गोळा केलेल्या घटकांचा वापर केला.

कलाकारांमध्ये टोकियो हसेगावा (रुबार्ब/व्होकल), युकीकानेको (व्हायोलिन), तात्सुरो मुराकामी (गिटार), केइटा इसे (बास गिटार), मुन्ना (इलेक्ट्रॉनिक पर्क्यूशन), केंटारो नागाता(गिटार), हितोमी निशिमुरा (परफॉर्मन्स/स्टोन), डीजे कार्डबोर्ड (परफॉर्मन्स/बांबू), रुका फुजिवारा (परफॉर्मन्स/गोरिला), काझुहारू नाकतानी (ध्वनी अभियंता), मसातो ओकुमुरा आणि शुईची यामदा यांचा समावेश होता.

माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष व विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक सौ. ज्योती ढाकणे, विश्व शांती कला अकादमीचे सरचिटणीस आदिनाथ मंगेशकर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR