22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरएसटीतील प्रथमोपचार पेट्या, वाय फायही झाले बंद 

एसटीतील प्रथमोपचार पेट्या, वाय फायही झाले बंद 

जळकोट : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांचा एसटी हा अत्यंत जिव्हळ्यााचा विषय आहे. तरीही महामंडळाकडून प्रवाशांना जेवढ्या सुविधा पाहिजे त्या मिळत नाहीत. विशेष म्हणजे अपघातकिंवा आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार पे्ट्या जखमीसाठी आधारभूत ठरतात. प्रत्येक बसमधील चालकांच्या केबिनमध्ये ड्रेंिसगसाठी मलम कॉटनपट्टी आदी विविध साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या बसविल्या आहेत पण या पेट्यांची अवस्था खराब झाली आहे.
    राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बसमध्ये मनोरंजन व्हावे यासाठी वायफाय सुविधा देण्यात आली होती. यामुळे लाल परी मध्ये वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते परंतु लाल परीमधील वायफायची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. आता केवळ अनेक बसमध्ये वाय-फाय ची मशीन ही शोभेची वस्तू दिसून येत आहे तसेच बसमधील प्रथम उपचार पेटीही व्यवस्थित नाही.
ग्रामीण भागात आजही बसच्या बाबतीत प्रवाशांचा पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही सकारात्मक आहे वयोवृद्धापासून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण बसणे प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात  मात्र एखादी किरकोळ अपघात झाल्यास जागेवर प्रथम उपचार व्हावे यासाठी अनेक बसमध्ये पेट्या बसवलेले आहेत परंतु अनेक पेट्यांना नेहमी कुलूप लागलेली असते. अनेक बसमधील प्रथमोपचार पेट्या या कालबा  झालेल्या आहेत. बसमध्ये मनोरंजनासाठी वायफाय सुविधा बसवण्यात आली परंतु तीही सध्या बंद आहे.
बसमधील प्रथम उपचार पेट्या व मनोरंजनासाठीचे वायफाय नावालाच असल्याचे सध्या दिसून येत आहे. याकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR