35.8 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांना पगार अर्धाच मिळणार

एसटी कर्मचा-यांना पगार अर्धाच मिळणार

मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळातील कर्मचा-यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचे वेतन फक्त ५६ टक्केच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ ५० टक्के पगार मिळणार आहे.

महामंडळाच्या कर्मचा-यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे २७७ कोटी रुपयांची आवश्यकता असते. मात्र राज्य सरकारकडून फक्त २७२ कोटींचा निधी मिळाल्याने संकट निर्माण झाले आहे. त्यातच मिळालेल्या निधीपैकी ४० कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचा-यांना कमी वेतन मिळणार आहे.

या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पगाराच्या वेळोवेळी होणा-या कपातीमुळे त्यांच्या रोजच्या गरजा भागवणेही कठीण झाले आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR