19.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeलातूरएसटी तिकिट सवलतीचा परवानाधारकांना फटका

एसटी तिकिट सवलतीचा परवानाधारकांना फटका

जळकोट : प्रतिनिधी
राज्य सरकारने महिलांना एसटी बसमध्ये पन्नास टक्के सवलतीच्या दरात प्रवास योजना सुरु केली. या निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असले तरीही दुस-या बाजूला काळी पिवळी परवानाधारक टॅक्सी, तसेच अन्य खाजगी व्यवसाय करून उपजिविका भागवणा-या मालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे  परमिट टॅक्सी मालक- खाजगी चालक यांच्यासह ट्रॅव्हल्सच व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असून अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.
राज्य सरकारने नुकताच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एसटी प्रवासात महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे तर त्या आधी पंचहातर त्यांच्या वरील नागरिकास मोफत प्रवासाची सवलत दिलेली आहे.  या निर्णयाचे पुरुष-महिला वर्गात जोरदार स्वागत झाले तर प्रवाशी संख्या वाढल्याचा एसटी महामंडळाला सुध्दा लाभ झाला परंतु रिसोड तालुक्यात या निर्णयामुळे काळी पिळी परमिट टॅक्सी व इतर खाजगी वाहन प्रवासी करणान्या वाहन चालक व मालकावर आर्थिकदृष्ट्या भुर्दंड पडला आहे. काळी पिवळी व इतर खाजगी वाहनांची एक फेरीही पूर्ण होत नसल्याने व प्रवाशांची वाट बघत संपूर्ण दिवस वाट पाहण्यातच निघून जात आहे.
 परमिट टॅक्सी वाहने तासंतास रिकामी दिसत आहे. सरासरी पुरुषांच्या सोबत महिलाही हमखास असतात महिलांना ५० टक्के प्रवास भाड्यात सुट असल्याने त्यांच्या बरोबर असलेल्या पुरुषांनाही एसटी बस मधून प्रवास करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. परिणामी दिवसभर काळी-पिवळी परमिट  गाड्या सतत रिकाम्या दिसल्याने इतर कोणतेही प्रवासी या वाहनात बसत नाहीत. त्यामुळेच  परवानाधारक वाहनांच्या फे-याही कमी होत असल्याने इंधनाचाही खर्च निघत नसल्याचे खाजगी वाहतूक करणा-या चालकांनी सांगितले .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR