लातूर : प्रतिनिधी
रत्नागिरी-नागपुर महामार्गावर लातूर तालुक्यतील भातखेडा शिवारात दि. २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एस.टी.बस व स्कूल बस यांच्यात अपघात झाला. यात स्कूल बसमधील तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एमएच २४, बी ७७३१ या क्रमांकाची लातूर ते उदगीर जाणार बस व एमएच २४, एएस ०७३७ या क्रमांकाच्या स्कुल बसचा समोरासमोरुन अपघात झाला. सकाळी धुके असल्यामुळे हा अपघात झाला, असे सांगण्यात येत आहे.
या अपघातात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात घडल्याचे लक्षात येताच काही महिला व उपस्थितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला व जखमींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमीसह सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या उजव्या डोळ्याच्या शेजारी थोडीशी जखम झाली आहे. हे विद्यार्थी लातूरच्या कृपा सदन शाळेसाठी गावातून निघाले होते. स्कुलबसमध्ये तीनच विद्यार्थी होते. तीन्ही विद्यार्थी भातखेडा येथील आहेत.