22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरएस.ई.एस.पॉलिटेक्निक येथे हिमोग्लोबिन तपासणी व रक्तदान शिबिर

एस.ई.एस.पॉलिटेक्निक येथे हिमोग्लोबिन तपासणी व रक्तदान शिबिर

सोलापूर: ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ- राष्ट्र जगाओ ’ तसेच सेवा या उपक्रमांतर्गत भारत विकास परिषद सोलापूर व डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने व एस. ई.एस. पॉलिटेक्निक महिला कमिटी यांच्या सहकार्याने एस. ई. एस. पॉलिटेक्निक येथे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. सुमारे २०३ विद्यार्थिनींची यावेळी हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली व ४० जणांनी यावेळेस रक्तदान केले.

काही विद्यार्थिनींनी प्रथमच रक्तदान केले.दोन्ही शिबिरास विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या विद्यार्थिनींना आरोग्य व आहारविषयक समुपदेशन करण्यात आले.
या कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे अध्यक्ष जितेश कुलकर्णी , डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके, एस. ई. एस. पॉलिटेक्निक चे प्राचार्य अतुल भावटणकर , कॉलेजच्या जनसंपर्क अधिकारी शुभदा देशपांडे, भारत विकास परिषदेचे जिल्हा संघटक महादेव न्हावकर, ज्येष्ठ सदस्य श्रीकांत कुलकर्णी, सुधीर देव, अविनाश केतकर , महेश साठे, रविंद्र नाशिककर उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर सर्व मान्यवरांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य भावटणकर व शुभदा देशपांडे यांनी एस. ई. एस. पॉलिटेक्निक ने वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. जितेश कुलकर्णी यांनी भारत विकास परिषद व त्यांचे कार्य तसेच घेण्यात येणाऱ्या महिला हिमोग्लोबीन तपासणी व रक्तदान शिबिर या बद्दल माहिती दिली. हेडगेवार रक्तपेढीचे मिलिंद फडके यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रमसिंह बायस व आभार प्रदर्शन प्रा.श्रीलता जन्नु यांनी केले.
वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सुरुवात व राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एस. ई. एस. पॉलीटेक्निकचे प्रा पद्मावती नागणसुरे, प्रा महेश पाटील, प्रा निलेश एखंडे, प्रा अजय पाटील व कॉलेज मधील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR