22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरऑटोतून जाणा-या शेतक-यांचे ५० हजार रूपये काढून घेतले

ऑटोतून जाणा-या शेतक-यांचे ५० हजार रूपये काढून घेतले

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात ऑटोमधून प्रवास करणा-या प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. परवा लातूर शहरातील गांधी चौक ते मिनी मार्केट  या  अत्यंत रहदारी असलेल्या काही पावलाच्या रस्त्यावरून ऑटोत बसून जाणा-या शेतक-याच्या खिशातील ५० हजार रूपये काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. बब्रूवान नारायण कदम रा. धानोरा, ता. निलंगा हे शेतकरी लातूरच्या महात्मा गांधी चौकातून हॉटेल अश्वमेघ कडे जाण्यासाठी एका ऑटोत बसले. महात्मा गांधी चौकचा ऑटो पॉईंट ते मिनी मार्केट हा रस्ता काही फुटाचाच आहे. एवढ्यात ऑटोतील एका ४० ते ४२ वर्षे वयाच्या अंगात फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घातलेल्या तोंडाला रूमाल बांधलेल्या व डोक्यावर टोपी घातलेल्या अनोळखी व्यक्तीने बब्रूवान कदम यांच्या बनीयनच्या खिशातील ५० हजार रूपये  काढून घेतले. या प्रकरणी त्या शेतक-याच्या तक्रारीवरून अनोळखी चोरट्याच्या विरोधात गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR