26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूरऑटो रिक्षाचालकांचा रात्रीस खेळ चाले

ऑटो रिक्षाचालकांचा रात्रीस खेळ चाले

लातूर : प्रतिनिधी
रात्री १० नंतर बसची सोय नाही किंवा इतर वाहन मिळणार नाही. या संधीचा फायदा घेत काही रिक्षाचालक ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्याने यावर वाहतूक पोलीसांचे आणि आरटीओ अधिका-यांचे लक्ष नाही का, असा प्रश्न प्रवाशांकडून केला उपस्थित केला आहे. रात्रीस खेळ चालणा-या अ‍ॅटोरिक्षा चालकांचा दिवसा ढवळ्या ही तमाशाच सुरू असून बॅच बिल्ला असला काय आणि नसला काय, त्यांना याचा काहीच फरक पडत नाही. आपल्याला कोण विचारणार याच तो-यात दिवसभर अण रात्रभर ते शहरभर वावरत असतात. ड्रेसचे म्हणाल, तर शहरातील बहुतांश रिक्षाचालक तुम्हाला ड्रेसमध्ये दिसणार नाहीत.
शहरातील रिक्षाचालक गणवेश परिधान न करता, बॅच बिल्ला, परवाना, रिक्षाची कागदपत्रे जवळ न बाळगता बिनदिक्कत प्रवासी वाहतूक करीत आहेत.रिक्षा वाहतूकसंदर्भात आरटीओकडून व परिवहन विभागाकडून विविध नियम दिले आहेत. या नियमांचे पालन करुन वाहतूक करणे गरजेचे आहे. मात्र अनेक रिक्षाचालकांकडून या नियमांना बगल दिली जाते. नियमानूसार रिक्षाची मागील उजवी बाजू बंद असणे आवश्यक असते. मात्र, रिक्षांचा उजव्या बाजूचा दरवाजा सताड उघडाच असतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR