बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटकातील एक कॉन्स्टेबल चंद्रशेखरचा व्हिडिओ कामाच्या वेळी डुलकी घेताना व्हायरल झाला. त्यानंतर कॉन्स्टेबलला नोकरीवरून निलंबित करण्यात आले. या विरोधात कर्मचा-याने हायकोर्टात धाव घेतली ज्यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आणि आराम करण्याचा अधिकार आहे. वेळोवेळी आराम आणि झोपेचे महत्त्वही न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असे न्यायाधीशांनी म्हटले.
चंद्रशेखर कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात एक ट्रान्सपोर्ट कॉन्स्टेबल म्हणून तैनात होता. निलंबित केलेल्या चंद्रशेखरने त्याच्या याचिकेत सलग २ महिने १६ तास शिफ्ट केल्यानंतर १० मिनिटांची डुलकी लागल्याने मला कामावरून निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. कोर्टाने या प्रकरणी केकेआरटीसीने दिलेला निलंबनाचा आदेश रद्द केला. या प्रकरणी कोर्टाने राज्य परिवहन प्रशासनालाच फटकारले.
दरम्यान, एका दिवसात कामाचे ८ तास असतात. कामाच्या दबावामुळे चंद्रशेखर यांना २ शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. मानवाधिकाराच्या कलम २४ मध्ये सर्वांना आराम आणि सुट्टीचा अधिकार मिळाला आहे. ज्यात कामाच्या तासांची योग्य वेळ आणि पगारासह सुट्ट्यांचा समावेश आहे. कामाच्या तासांमध्ये दिवसाला ८ तास आणि आठवड्याला ४८ तासांहून अधिक नसावे असे कायद्यात आहे.