22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटी विसर्जित

ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटी विसर्जित

ओडिशा : ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटी विसर्जित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या वतीने आज एक प्रसिद्धिपत्रक जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात असे लिहिले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटी पूर्णपणे विसर्जित करण्यास मंजुरी दिली आहे.

विसर्जित समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष, पीसीसी, त्याचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी, जिल्हा, ब्लॉक, विभागीय काँग्रेस समित्या, आघाडीच्या संघटना, विभाग आणि सेल यांचा समावेश आहे. नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत विद्यमान प्रदेशाध्यक्ष कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम करतील असेही या प्रसिध्दिपत्रात नमूद केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR