22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसींना फसविले की मराठ्यांना?

ओबीसींना फसविले की मराठ्यांना?

धुळे : मराठा समाजाला आरक्षण कसे दिले हे स्पष्ट केलेले नाही. आरक्षण देताना नेमके ओबीसींना फसविले की मराठ्यांना, असा प्रश्न करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे रामराज्य नव्हे तर, रावणराज्य आहे, अशी टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची उत्तर महाराष्ट्र विभागीय जिल्हानिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीआधी पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत, असा प्रश्नही पटोले यांनी केला. जनगणनेच्या आधारावर आरक्षण द्यायला हवे, पण केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम सरकारने केले आहे. ओबीसी आणि मराठा समाजापैकी कोणाला कसे आणि काय आरक्षण दिले, हे स्पष्ट करायला हवे.आरक्षण देताना फसवाफसवीचे राजकारण केले जात आहे. हे फसवे सरकार आहे. आरक्षणाचा अध्यादेश फडणवीस यांनीही काढला होता, तेच आताही केले आहे, असे नाना पटोले यांनी नमूद केले.

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांनाच आपल्या पक्षात घेतात, अशी भाजपची नीती आहे. रामापेक्षा मोठे झाल्याचा त्यांचा अविर्भाव आहे. मूळ मुद्दे सोडून अन्य मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. रावणापेक्षाही वाईट राज्य दिसत आहे. उत्तर प्रदेशची पध्दत मुंबईतील मीरा रोडवर आणली आहे. ही हुकूमशाहीची मानसिकता असून तसे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होत आहे. रामाच्या आधारावर देशात विभाजन करण्याचा प्रयत्न काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
जागोजागी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. भाजपकडे माणसे नाहीत. भाजपने भ्रष्टाचारी लोक जमा करून ठेवले आहेत. तिकडे गेलेल्यांसाठी आता इकडची दारे बंद झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR