नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून गाझा पट्ट्यात इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा पॅलेस्टाईनला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे भारताने पॅलेस्टाइन मधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून या भागातील लोकांना मदत पोहोचवण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे तातडीची गरज आहे असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, अरिंदम बागची म्हणाले. सध्या सुरू असलेला संघर्ष या प्रदेशात किंवा त्यापलीकडे पसरू नये. दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे ही बाब कोणत्याही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही असेही त्यांनी ठणकावले. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या अहवालानंतर परस्पर संवादातील मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्रादरम्यान एका निवेदनात बागची यांनी हे सांगितले.
बागची यांनी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करण्याच्या सार्वत्रिक बंधनाबाबत स्पष्ट असण्याची गरजही व्यक्त केली. बागची म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील सध्याची परिस्थिती ही गंभीर चिंतेची बाब आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, विशेषत: महिला आणि मुलांचे नुकसान होत आहे. मानवतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंतचिंतेची आहे. हे स्पष्टपणे अस्वीकाहार्य आहे आणि आम्ही सर्व नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध करतो.
दहशतवाद कायमच अयोग्य!
मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मानवतावादी कॉरिडॉरची तातडीने गरज आहे. हा संघर्ष प्रदेशात किंवा त्यापलीकडे पसरू नये. दोन-राज्य तत्त्वावर आधारित इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढणे पूर्वीपेक्षा अधिक निकडीचे झाले आहे यावर भारताने भर दिला. दहशतवाद आणि लोकांना ओलीस ठेवणे ही बाब कोणत्याही परिस्थिती स्वीकारली जाणार नाही असेही त्यांनी ठणकावले. भारत आपल्या बाजूने द्विपक्षीय विकास भागीदारीद्वारे पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत राहील आणि पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.