32.5 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रऔरंगजेबाच्या कबर परिसरात पुन्हा पोलिस बंदोबस्त वाढवला

औरंगजेबाच्या कबर परिसरात पुन्हा पोलिस बंदोबस्त वाढवला

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
आज (२९ मार्च) छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने प्रशासन अलर्ट झाले आहे. खासकरून संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील औरंगजेबाच्या कबरीचा वाद अजून थांबलेला नाही. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावर हिंदुत्ववादी संघटना ठाम असून ही कबर हटवण्याची वारंवार मागणी करत आहेत. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती आहे. खासकरून मराठवाड्यातील संभाजीनगरमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसही अलर्ट झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात आता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर दोन-तीन दिवसांत उखडून टाकण्याचा इशारा दिला होता. ज्या ज्या संघटनांनी हा इशारा दिला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. तसेच इशारा देणा-या हिंदुत्ववादी संघटनांच्या सात जणांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

तसेच औरंगजेबाच्या कबरीभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात येणा-यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच प्रत्येकाची नोंद ठेवूनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे.
मुख्य प्रवेशद्वारासमोर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. तसेच एकावेळी एकाच व्यक्तीला आत प्रवेश करता येईल असे नियोजन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR