37.4 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeमहाराष्ट्रऔरवाड पुलावर मधमाशांचा हल्ला; पाच जण जखमी

औरवाड पुलावर मधमाशांचा हल्ला; पाच जण जखमी

कुरुंदवाड : औरवाड (ता. शिरोळ) पुलावर मधमाशांच्या थव्याने अचानक हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्याने मोठी घबराट पसरली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने कुरुंदवाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुजाता राजेंद्र शिरगावे (वय ४९, रा. औरवाड, ता.शिरोळ) असे जखमी महिलेचे नाव आहे. नृसिंहवाडी आणि औरवाड दरम्यान असलेल्या पुलावर काही नागरिक प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक मोठ्या संख्येने मधमाशांनी हल्ला केला. काही नागरिकांनी पळून जाऊन बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाच जणांना मधमाशांनी चावा घेतला. या हल्ल्यात पुरुष आणि महिलांचा समावेश असून, एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

जखमी नागरिकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी महिलेवर कुरुंदवाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR