29.7 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeलातूरऔशाला जे जमले ते जिल्ह्यातील पालिका, पोलीस प्रशासनाला का जमत नाही

औशाला जे जमले ते जिल्ह्यातील पालिका, पोलीस प्रशासनाला का जमत नाही

लातूर : प्रतिनिधी
औसा नगर पालिकेच्या हद्दीत शहरालगत अनधिकृतपणे लॉजिंग व्यवसाय चालविणा-या आठ लॉजला पालिकेने सील केले आहे. सलग दुस-या दिवशीही पोलिस व पालिका प्रशासनाच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यात आली. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतूक केले जात असतानाच जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरात व महामार्गालगत विनापरवाना, अनधिकृतपणे लॉजिंगचा व्यवसाय सुरू असताना औश्यात जे जमल ते जिल्ह्यातील पालिका व पोलीस प्रशासनाला का जमत नाही असा सवाल केला जात आहे.
जिल्ह्यातील औसा शहरातून जाणा-या महामार्गाच्या दोन्ही बाजूने लोकवस्तीत असलेल्या अनेक लॉजिंगकडे लॉज चालवण्याचा तसेच साधा बांधकाम परवानासुद्धा उपलब्ध नाही. हे लॉजिंगचे पेव पसरलेले असताना कसलाही परवाना नसताना सदरचा अनधिकृतपणे व्यवसाय करत होते. या अनधिकृत व्यवसायातून औसा शहर आंबटशौकिनांचे केंद्र बनले आहे. तसेच काही लॉजमध्ये बाहेर राज्यातील महिला आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसायही केला जात होता.
याबाबत कार्यवाही करत औसा पालिकेने ११ मार्च रोजी शहरातील ८ लॉजमालकांना रीतसर नोटीस बजावून ३ दिवसांत बांधकाम, व्यवसाय व लॉजिंगचा परवाना मागितला पण पालिकेने दिलेल्या मुदतीत कुणीही परवाना सादर न केल्याने पालिका व पोलीस प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतर अखेर पालिकेने मागील दोन दिवसापासून लॉजिंग सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे. औसा शहरा प्रमाणेच लातूर जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, शिरूरअनंतपाळ, जळकोट, देवणी, रेणापूर व निलंगा शहरात व जिल्ह्यातून गेलेल्या महार्मावर विनापरवाना व अनाधिकृत लॉजिंग व्यवसायाचे पेव फुटले असून अशा अनाधिकृत व्यवसाय चालवणा-या एखाद्या लॉजवर अधूनमधून थातूरमातूर कारवाई केली जाते.  परंतु याचा परीणाम संबधितांवर होताना दिसून येत नाही.
जर औसा पालिका व पोलीस प्रशासना प्रमाणे जिल्ह्यातील इतर शहरातील महापालिका, पालिका व पोलीस प्रशासनाने अनधिकृत लॉजिंग व्यवसाया विरोधात कारवाईचा बडगा उगारला तर निश्चितच पेव फुटलेल्या जिल्ह्यातील विना परवाना, अनाधिकृत लॉजिंग व्यवसायाला आळा बसणार असून तशी मागणी ही जिल्ह्यातील नागरिकांकडून औसा पालिका व पोलीसांचे कौतूक करताना करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR