28.4 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeलातूरऔसा तहसीलसमोर 'एमआयएम'चे धरणे आंदोलन

औसा तहसीलसमोर ‘एमआयएम’चे धरणे आंदोलन

औसा :  प्रतिनिधी
केंद्र शासनाने लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ हा काळा कायदा मंजूर केला असून सदरचा  कायदा हा मुस्लिम समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित करणारा तसेच मुस्लिम समाजाचा हक्कावर गदा आणणारा आहे, असून
सदरील कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणीसाठी एमआयएमच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
वक्फ हा आमच्या पूर्वजांनी मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी व धार्मिक दर्गा मस्जिद, ईदगाह, इमामबाडे, कब्रस्तान, अशुरखाने, खानखाह, तकिया आदीसाठी सदरील जमीन देवाच्या नावावर वक्फ केलेली आहे व सदाचे वक्फ आधिन असून मुस्लिम समाजाला या कायद्याने त्रास होणार आहे.  केंद्र सरकारने हा कायदा सर्व मुस्लिम समाजाच्या  वंचित घटकासाठी आणला असल्याचे गाजावाजा करीत आहेत. त्यामध्ये इतर समाजाच्या लोकांची घुसखोरी करण्यासाठी सदरचा कायदा दुरुस्ती करण्यात आला आहे परंतु संविधान पायमल्ली करून सत्तेच्या बळावर सदर कायदा बनविण्यात आला आहे तरी सदरील कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा यासाठी  औसा येथे एम आय एम व मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून औसा तहसीलदार मार्फत  महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळीएम आय एम औसा प्रमुख सयÞ्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख नयÞ्युम, शेख अलीम, शेख मुशिर, हारुणखा पठाण, अजहर कुरेशी, इस्माईल बागावान, इरफान बागवान, सोहेल सौदागर, इरशाद तडोले, शेख इरफान, शेख इम्रान,  शेख कलीम, सयÞ्यद हाफेज आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR