31.3 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeलातूरऔसा तालुक्यातील तपसे चिंचोलीचा नृसिंह क्लब विजेता

औसा तालुक्यातील तपसे चिंचोलीचा नृसिंह क्लब विजेता

औसा  : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पीयनचे तालुकास्तरीय क्रिकेटचे आयोजन औसा शहरातील उटगे मैदान येथे करण्यात आले होते. या क्रिकेट चॅम्पियनसाठी तालुक्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला होता. दिवसा सामने खेळविण्या आले होते. या क्रिकेट  स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे तसेच अमरंिसंह भोसले यांच्या हस्ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.
क्रिकेट चंपीयनच्या अंतिम सामन्यात औसा येथील एस एच स्पोर्ट क्लब तर औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथील नृंिसह क्रिकेट क्लब या दोन्ही संघात अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात तपसेचिंचोली येथील नृंिसह क्रिकेट क्लब विजेता तर औसा येथील एस एच संघ उपविजेता ठरला आहे. अंतिम सामना दहा षटकाचा  खेळण्यात आला होता. विजेत्या संघाला श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते ५१ हजार रुपयांचे पारितोषक व ट्रॉफी देण्यात आली. यावेळी सनाऊल्ला शेख, ज्ञानोबा जोगदंड, अँड.समीयोद्दीन पटेल, ज्यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा पार पडली यावेळी प्रशांत भोसले, मुकेश बिदादा, किशोर टोम्पे,पत्रकार संजय सगरे,हाजीभाई शेख, राजू कसबे, विवेक मश्रिा,मनोज शिदे, विलास चौधरी,  संजय  लोंढे, नियामत लोहारे, खाजा शेख,सरफराज पटेल, अभि धानुरे,आरबाज शेख यांच्या सह क्रिकेट प्रेमी  उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR