16.1 C
Latur
Wednesday, December 3, 2025
Homeलातूरऔसा नगर परिषदेसाठी ७५ टक्के मतदान 

औसा नगर परिषदेसाठी ७५ टक्के मतदान 

औसा : प्रतिनिधी
औसा नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षासह २३ नगरसेवक पदासाठी ७८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शहरात मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीचा उत्सव  साजरा करीत औसा नगर पालिकेसाठी.७५.६७  टक्के मतदान झाले आहे. औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी औसा शहरात सर्वच ३६  मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले.
औसा शहरातील एकूण मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी थंडी असल्याने मतदानाचा टक्का कमी होता. सकाळी दहा नंतर मतदारांनी  मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सकाळ सत्रात मजूर वर्ग व जेष्ठ मतदार आणि तरुणांनी गर्दी केली होती तसेच लग्नाची तिथी असल्याने शहरात आणि बाहेर लग्न असणा-या लग्न घराच्या लोकांनी सकाळी आपले मतदान उरकले तर ११  नंतर महिलांची संख्या वाढली.  दुपारी  एक  ते पाच  वाजेपर्यंत सर्वच मतदान  केंद्रावर मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. औसा नगर परिषदेसाठी झालेल्या आजच्या मतदानातून ११ प्रभागातून २३ सदस्य आणि एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. सकाळी ९.३० वाजे पर्यंत फक्त १३ टक्के मतदान झाले तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४४. ३८ टक्के आणि दुपारी ३.३० पर्यंत ५९.९७ टक्के मतदान झाले होते. निवडणूक विभागाकडून मतदारांची केलेली जनजागृती, कार्यकर्त्याकडून घरोघरी जाऊन मतदारांना  मतदान केंद्रावर आणून प्रत्यक्ष मतदान करून घेतल्याने मतदानाचा टक्का वाढला.निवडणूक विभागाच्या वतीने निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार घनशाम आडसूळ, सहा, सहाय्यक निवडणूक अधिकारी मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी व पोलीस निरीक्षक आर. के. ढमाले यांच्या सुव्यवस्थेखाली मतदान प्रक्रिया  शांततेत पार  पडली.
औसा नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार तर २३ नगरसेवकपदाच्या जागांसाठी ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यासाठी मतदान झाले. औसा शहरातील वॉर्ड क्र. ४ मधील मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात इतर मतदान केंद्राच्या तुलनेत या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदान झाले. प्रभाग ४ मधील मतदानकेंद्र क्रमांक ३ वर मतदानाची वेळ संपल्यानंतर रांग लागल्याने याठिकाणी  सायंकाळी  सव्वा सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. औशाचे  आमदार अभिमन्यू  पवार व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांच्या नेतृत्वात या लढती अटीतटीच्या  झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR