. औसा ( प्रतिनिधी ) – धाराशीवहून हैद्राबादला १५ टन गोमांस घेऊन जाणारा टेंम्पो औसा पोलिसांनी पकडला असून टेंम्पोचालक पळून गेला आहे .. याबाबत ची माहिती अशी कि औसा मार्गे मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती एका गुप्त व्यक्तिकडून मिळाल्यानंतर औसा पोलिसांनी धाराशीवहून येणाऱ्या मार्गावर वाहन तपासणी सुरु केली असता रविवार दि २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सहा च्या सुमारास औसा ते निलंगा रस्त्यावर यमुना बारच्या समोर रस्त्यावर एक आयशर टेंपो क्रमांक एम एच ४० सीएम ०१८२ मध्ये २० टन मांस यामध्ये १५ टन गोमांस आढळून आला यावेळी टेंपोचालक फरार झाला आहे . याबात औसा पोलिसात गुरन व कलम* 175/ 2024 कलम 5, अ 5 (ब) 5 (क), 9, 9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित गोहत्या अधिनियम 1995 नुसार आयशर टेम्पो क्रमांक एम एच 40 सीएम 0182 चा चालक व मालक यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
यातील नमूद आरोपीतांनी अवैध रित्या गोवंश त्यांचे कत्तल करून गोमांस विक्री करीता आयशर टेम्पो क्रमांक एम एच 40 सीएम 0182 वाहनामध्ये २०टन मांस यामध्ये १५ टन निव्वळ गोमांस (किंमत १५ लाख रुपये )वाहतुक करताना भेटल्याने यातील आरोपी हा टेम्पो सोडून गेल्याने त्याचे विरुद्ध औसा पोलीस स्टेशनला वरील प्रमाणे गुन्हा नोंद करून यातील मिळून आलेला मुद्देमाल हा माननीय न्यायालयाच्या आदेशाने नगरपरिषद रँं’ डेपो औसा येथे नष्ट करण्यात आला आहे . अधिक तपास औसा पोलिस करीत आहेत .