18.8 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeलातूरऔसा येथे अतिरिक्त एमआयडीसीची निर्मिती करा

औसा येथे अतिरिक्त एमआयडीसीची निर्मिती करा

औसा : प्रतिनिधी

औसा येथे अतिरिक्त एमआयडीसीची निर्मिती करणे, औसा एमआयडीसीमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि लातूर येथील विमानतळ विकसित करून विमानसेवा सुरु करणे या विषयांसाठी विधिमंडळात आवाज उठविण्यासह शासनस्तरावर मागच्या अनेक महिन्यांपासून आमदार अभिमन्यू पवार पाठपुरावा करीत आहे. त्याच अनुषंगाने उपरोक्त विषयासंदर्भात (दि.१८) डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.

या बैठकीत औसा एमआयडीसीमध्ये नवीन उद्योगांसाठी जागा शिल्लक नाही त्यामुळे अतिरिक्त एमआयडीसी निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.बेलकुंड-ंिचचोली सोने भागात राष्ट्रीय महामार्गालगत २००- ३०० हेक्टर जमीन उपलब्ध होऊ शकते, त्याअनुषंगाने उद्योग विभागाने तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. उद्योग मंत्र्यांनी अधिवेशन संपल्यानंतर २२ डिसेंबर रोजी एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे यांनी प्रस्तावित स्थळाला भेट देऊन पाहणी करावी, ३० डिसेंबर पर्यंत हाय पॉवर कमिटीसमोर अहवाल सादर करावा आणि ३ महिन्यात एमआयडीसीला मान्यता मिळेल अशा पद्धतीने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या. औसा एमआयडीसीमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते निर्माण करण्यासाठी ५.५ कोटींचा निधी मंजूर करण्याचे निर्देशही यावेळी उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिले.

या बैठकीला एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी(प्रशासन) अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सोनाली मुळे, मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी न-हे विरोळे, प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, कार्यकारी अभियंता रमेश गुंड व तहसीलदार भरत सूर्यवंशी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR