सोलापूर-तुळजापूर रोडवरील कचरा डेपो, बायो-एनर्जी वीजनिर्मिती प्रकल्प तसेच शहरातील कचरा ट्रान्स्फर स्टेशनला महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी भेट देऊन तेथे चालणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली.
आयुक्त ओम्बासे यांनी जुळे सोलापुरातील एचएसआर टाकीजवळ असलेल्या ट्रान्स्फर स्टेशनमध्ये जाऊन तेथील कचरा वाहतुकीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी रुपाभवानी चौकातील ट्रान्स्फर स्टेशनचींही पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिकारी अनिल चराटे उपस्थित होते.
शहरातील घरोघरीचा कचरा घंटागाडीद्वारे कशा पध्दतीने गोळा करण्यात येतो. रोज किती टन कचरा जमा केला जातो. नंतर तो ट्रान्स्फर स्टेशन याठिकाणी ओला व सुका विलगीकरण करून मोठ्या आरसी हुक लोडर वाहनातून कचरा डेपोला जातो. तसेच दैनंदिन येणाऱ्या कचऱ्यावर बायो एनर्जी प्लांट
येथे प्रक्रिया करून याठिकाणी वीजनिर्मिती व खतनिर्मिती केली जाते. याठिकाणी कशा पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
बायो-एनर्जी याठिकाणी तीन मेगावॉट वीजनिर्मिती तर २० ते २५ टन दररोज कंपोस्ट खत तयार केले जाते. तुळजापूर रोड येथील नवीन तयार करण्यात आलेल्या मृत प्राण्यांसाठीच्या विद्युतदाहिनीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली.