31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरकच्चा माल महागल्याने माठांच्या किंमती वाढल्या 

कच्चा माल महागल्याने माठांच्या किंमती वाढल्या 

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील थंडी आता पूर्णपणे ओसरली असून उन्हाच्या झळा सगळीकडे चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणा-या माठाची मागणी वाढत आहे. कुंभार व्यवसायिकांच्या वर्षभर केलेल्या कष्टानंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शहरातील जुने गुळ मार्केट चौका परिसरात नांदेड रोडवर शहरातील कुभाराकडून माठ विक्रीसाठी दुकाने थाटली असून खरेदीचा जोर वाढत आहे. उन्हाच्या झळा वाढू लागल्यात्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून संबोधल्या जाणा-या माठाचे बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने यंदा माठाचे दर जवळपास ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
बाजारात लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. तसेच, माठाच्या  बाजारात तेजी येईल असा माठ व्यावसायिकांकडून अंदाज व्यक्त्त केला जात आहे. कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनविण्यासाठी मग्न असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे गरिबांना आवाक्याबाहेर असल्याने मातीच्या माठांना फ्रीज मानून तहान भागवितात. मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरातील काही भागात माठ विक्रीत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR