27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रकच-याच्या ढिगा-यात ७ अर्भकं फेकली

कच-याच्या ढिगा-यात ७ अर्भकं फेकली

दौंडमधील धक्कादायक दृश्य प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये चिमुकल्यांचे अवयव

दौंड : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरालगत असणा-या बोरावकेनगर भागामध्ये कच-याच्या ढिगा-यामध्ये सहा ते सात अर्भकं आढळून आली आहेत. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अर्भकं कच-याच्या ढिगा-यामध्ये फेकण्यात आली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही अर्भकं नेमकी कोणत्या रुग्णालयाने फेकून दिली आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरालगत असणा-या बोरावकेनगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे कच-याच्या ढिगा-­यात ही अर्भकं आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले आहेत. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी ही अर्भकं आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोगशाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत असली तरी हा गर्भपाताचा प्रकार आहे का? या दृष्टीने देखील पोलिस तपास करीत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली. यानंतर तातडीने दौंड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणीअंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावले. ही अर्भकं आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले? कोणी टाकले? हा गर्भपाताचा प्रकार आहे का? याचा शोध आता घेतला जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR