22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकटेंगे-बटेंगे सोडा महागाईचे बोला, थोरातांचा विरोधकांना टोला

कटेंगे-बटेंगे सोडा महागाईचे बोला, थोरातांचा विरोधकांना टोला

गुलामगिरीत राहू नका, न घाबरता मतदान करा

नाशिक : प्रतिनिधी
‘कटेंगे-बटेंगे’ सोडा महागाईचे बोला, हे बोलले तर अडचण येईल म्हणून वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जायचा प्रयत्न विरोधकांचा सुरू असल्याचे म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
दरम्यान, शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

पुढे बोलताना थोरात म्हणाले, माझे गाव या मतदारसंघात आहे. मी इथला मतदार आहे. मला म्हणतात यांचा इकडे काय संबंध. आम्ही गणेश कारखाना अडचणीतून चांगला चालवला. आम्ही सिद्ध केले की आम्ही करू शकतो. त्यामुळे २० तारखेला आघाडीला मतदान नक्की द्या असे थोरात म्हणाले. निवडणूक आयोगाकडून माझ्या व प्रभावती घोगरे यांच्या भाषणांवर बंदी येण्याची शक्यता आहे. तशी तयारी देखील सध्या सुरू आहे.

एवढी भीती नेमकी कशाची वाटली असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर टीका केली. अनेक कार्यकर्त्यांचे हातपाय तोडले. हे सगळे भीती बसवण्याकरता. मात्र तुम्ही घाबरायचे नाही काकीला मतदान करायचे. गुलामगिरीत राहायचे नाही. नाहीतर गुलामगिरी कायमची बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही असे थोरात म्हणाले. कटेंगे-बटेंगे सोडा महागाईचं बोला असा टोलाही थोरातांना लगावला.

शिर्डी विधानसभा मतदारसंघाची लढत चुरशीची
नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाची लढत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण या मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) यांच्या विरुद्ध प्रभावती घोगरे (काँग्रेस) अशी लढत होत आहे. या लढतीकडे सूपर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात काँटे की टक्कर आहे. त्यामुळे कोण विजयाचा गुलाल उधळणार हे येत्या २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR