24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरकत्तलीसाठी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर: कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहनामध्ये १७ जनावरांना दाटीवाटीने बसवून वाहतूक केल्याबद्दल चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून जनावरांना ताब्यात घेतले. पुणे- सोलापूर रोडवरील महिंद्रा शोरूमजवळ ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलिस ज्ञानेश्वर रमेश गायकवाड यांनी फिर्याद दिली असून, मो. अहमद नदाफ (रा. निप्पाणी व्यंकट बेनूर, ता. चितापूर), मो. सादिक युसूफ शेख (रा. जुनी मलिक पेठ, शंकर नगर), म. मस्तान सब्दार अली (रा. मलिकपेठ, शंकरनगर, हैदराबाद), हाजी जातकर (रा. कुंची ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार आहेत. सोलापूर-पुणे हायवेवरील महिंद्रा शोरूमजवळ ते कर्तव्यावर असताना त्यांना टी एस १२ यु टी ०५०२क्रमांकाचा टेम्पो जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.

या वाहनाला थांबवून तपासणी केली असता यात १७ लहान म्हशी दाटीवाटीने असल्याचे आढळून आल्या. यातील एक म्हैस मृतावस्थेत दिसून आली. नमूद आरोपींकडे वाहतुकीचा परवाना अथवा जनावरे खरेदीची पावतीची विचारणा करता ती आढळून आली नाही. सदरची जनावरे कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याने नमूद आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस नाईक कसबे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR