26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रकन्नडीगांचा उन्माद; चालकाच्या तोंडाला फासले काळे

कन्नडीगांचा उन्माद; चालकाच्या तोंडाला फासले काळे

कोल्हापूर : कन्नडीगांचा उन्माद महाराष्ट्रासाठी नवा नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून कानडी सतत महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची छेड काढत असतात. अशातच आता कन्नडीगांनी पुन्हा धुडगूस घातल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला कन्नड भाषा येत नसल्याने चक्क त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवाय यावेळी बसला देखील काळे फासले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक वाद पेटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई-बंगळुरू बसवर कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. चालकाला गाडीतून खाली ओढत त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कर्नाटकात जायचं असेल तर कन्नड बोलायलाच हवं, असे म्हणत कन्नड कार्यकर्त्यांनी एसटीला देखील काळे फासले.
कर्नाटकमधील चित्रदुर्गजवळ हा संतापजनक प्रकार घडला. संबंधित घडलेली माहिती चालकाने कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबईवरून बंगळुरूला जाणारी एसटी महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस चित्रदुर्गजवळ येताच कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला अडवले. तसेच कन्नडमध्ये घोषणा द्यायला सुरुवात केली. चालकाला बसमधून खाली खेचत त्याच्याशी हुज्जत घातली. तुम्हाला कर्नाटकमध्ये यायचं असल्यास, तुम्हाला कन्नड यायलाच पाहिजे, असा वाद घालण्यास सुरुवात केली.

मात्र हुल्लडबाज कन्नड कार्यकर्त्यांनी एसटी चालकाच्या तोंडाला काळे फासले आणि एसटीलाही काळे फासले. तर चालकाला काळे फासणारे सर्वजण अंधारात पसार झाले. कोल्हापूर विभागातील भास्कर जाधव असे या चालकाचे नाव आहे. दरम्यान या प्रकारानंतर महाराष्ट्रातील मराठी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR